Yogesh shirsat biography of donald

विनोदाचा हुकमी एक्का

Maharashtra Times | Updated: 21 May 2017, 2:29 am

Subscribe

रंगभूमीवर वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर योगेश शिरसाट मुंबईत दाखल झाला.

लेखन, अभिनय व दिग्दर्शन अशी तिहेरी कामगिरी करून त्याने इंडस्ट्रीत जम बसवला. ‘दुनियादारी’ चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. तर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ त्याला घराघरांत घेऊन गेली. करिअर स्थिरावणारी ‘बुलेट ट्रेन’ त्याला गवसली.

Maharashtra Times
अग्निपथ



- तुषार बोडखे
[email protected]

रंगभूमीवर वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर योगेश शिरसाट मुंबईत दाखल झाला.

लेखन, अभिनय व दिग्दर्शन अशी तिहेरी कामगिरी करून त्याने इंडस्ट्रीत जम बसवला. ‘दुनियादारी’ चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. तर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ त्याला घराघरांत घेऊन गेली. करिअर स्थिरावणारी ‘बुलेट ट्रेन’ त्याला गवसली.

संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कॉलेजातील तरूणांचे वेगळे चित्र मांडणारा ‘दुनियादारी’ इतर पठडीबाज चित्रपटांपेक्षा वेगळा होता.

गाणी, चित्रीकरण, भूमिका अशी सगळीच भट्टी जमली होती. विशेष म्हणजे ‘दुनियादारी’चे संवाद व प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायमची कोरली गेली. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांच्यासोबत चमकलेल्या ‘शिऱ्या’ अर्थात योगेश शिरसाट या गुणी कलाकारांची महाराष्ट्राला ओळख झाली. भूमिकेच्या मर्यादा ओलांडून आपली छाप पाडण्याचे कौशल्य आत्मसात करणाऱ्या योगेशची गाडी सुसाट सुटली.

‘दुनियादारी’ कारकिर्दीचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. आता आठवड्यातून अनेकदा ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या विनोदी मालिकेद्वारे तो घराघरात पोहचतो. मराठवाडी भाषेच्या लहेजाचा विनोद निर्मितीसाठी उत्तम वापर करणारा योगेश हजरजबाबी कलाकार आहे. विनोदासाठी आवश्यक टायमिंगची अचूक जाण असल्यामुळे त्याच्यातील कलाकार अधिक बहरला.
‘बुलेट ट्रेन’ वेगात धावत असताना त्यातील नवोदित कलाकारांचे करिअरसुद्धा वेगात धावू लागले.

मराठी रसिकांना गुणी कलाकारांची खरी ओळख झाली. अर्थात, योगेशने यापूर्वी ‘फू बाई फू’ मालिकेसाठी संहिता लेखन केले होते. अभिनय हेच त्याचे कौशल्य नाही. तर, लेखन-दिग्दर्शन व रंगभूषा या क्षेत्रातही त्याचा हातखंडा आहे. नाट्य चळवळ ऐन जोमात असताना, औरंगाबाद शहरातील प्रमुख धडपड्या रंगकर्मीत योगेश आघाडीवर होता. एकांकिका, पथनाट्य, नाटक अशी चौफेर मुशाफिरी सुरू होती.

राज्य नाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धेत पारितोषिकांची लयलूट हमखास ठरलेली. सरस्वती भुवन महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील नाट्यशास्त्र विभागात मित्रांसोबत नेहमी नाटकांवर चर्चा चालायची. कधी लोकनाट्य फॉर्म तर कधी प्रायोगिक फॉर्म.

Rikard karlberg narrative channel

पण, नाटकातून वैविध्य जपण्यावर जास्त भर असायचा. उत्स्फूर्त अन् हजरजबाबी अभिनयाचा नेटका आदर्श योगेशने अनेक कलाकृतीतून घातला. पण, एकांकिका किती दिवस करणार असा प्रश्न होताच. मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर सापडणे कठीण होते. अखेरीस मुंबईत योगेशची धडपड सुरू झाली. अभिनय आणि लेखन क्षेत्रात जम बसवण्यासाठी वेगवेगळ्या निर्माता-दिग्दर्शकांची भेट घेणे सुरू झाले.

औरंगाबाद ते मुंबई अप-डाऊन करण्यातच काही वर्षे गेली. सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास संधीचे दार खुले होतेच याची प्रचिती आली. मालिका, चित्रपट आणि नाटक अशी तिहेरी संधी मिळाली. ‘फू बाई फू’ व ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या दोन मालिकांसाठी पाचशे भागांचे संहिता लेखन केले. लेखक म्हणून हे उल्लेखनीय यश ठरले. सध्या योगेश मुंबईत स्थिरावला आहे.

मुंबईत स्वतःचे घर घेऊन कुटुंबासह वास्तव्य आहे. या टप्प्यावर स्थैर्य दिसत असले तरी संघर्ष संपला नाही असे त्याला वाटते.
‘स्ट्रगल मुळीच संपला नाही. कलाकार सुरूवातीला काम मिळवण्यासाठी धडपडत असतो. मालिका आणि चित्रपट केल्यामुळे लोक ओळखू लागले. पण, आता काम टिकवण्याची धडपड आहे. चांगले काम कधी-कधीच मिळते. मी पाचशे स्किट लिहिल्या तरी सगळेच चांगले नव्हते.

कधी निराशा तर कधी आनंद असतो. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील स्ट्रगल कधीच संपत नाही. इथे सरकारी नोकरीसारखे स्थैर्य नसते. कलाकाराचा संघर्ष संपू नये असे मला वाटते,’ असे योगेश प्रांजळपणे सांगतो. मुंबईत वडापाव खाऊन दिवस काढल्याशिवाय स्ट्रगल संपत नसतो, अशी लोकांची समजूत आहे. पण, ग्रामीण भागातील कलाकारांचा त्यांच्या भागातच एवढा स्ट्रगल झालेला असतो, की मुंबईतील
स्ट्रगल मुळीच अवघड वाटत नाही, असे योगेशचे मत आहे.
जिद्द व चिकाटी असेल तर चांगले काम मिळते.

एखाद्या कलाकाराला सहा महिने ऑडिशन देऊनही काम मिळत नाही. तर कधी एकदाच दोन-तीन कामे एकत्र मिळतात. स्ट्रगलची व्याख्याच वेगळी असल्याचे योगेश मानतो. ‘दुनियादारी’ चित्रपटामुळे योगेशचे कला व लेखनगुण इंडस्ट्रीत माहिती झाले. सध्या चांगल्या भूमिका करून रसिकांना जिंकण्याची त्याची धडपड आहे. ‘सरस्वती’ मालिकेत तो चांगल्या भूमिकेत आहे. ‘थँक यू विठ्ठला’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे लेखन योगेशने केले आहे.

या चित्रपटात महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘चिवटी’, ‘व्हेंटीलेटर’ चित्रपटातही योगेश झळकला आहे. ‘कशाचा भारत बसलो चरत’ या नाटकाचे श्याम राजपूतसह राज्यभर प्रयोग सुरू आहेत. कलाकाराने उत्तम भूमिकांचा शोध घ्यावा आणि स्वतःला घडवावे हाच त्याचा ध्यास आहे. ध्येयासक्ती असलेल्या योगेशची वाटचाल मराठवाड्यातील नवोदित कलाकारांना आत्मबळ देणारी आहे.

ध्येय निश्चित करा
कला क्षेत्रात जम बसवताना मुंबईला जाऊनही अनेकजण अपयशी ठरतात.

मूळात करिअरबाबत नियोजन चुकल्याने अपयश पदरी पडते.

Christopher lloyd compact biography of martin

या कलाकारांना योगेश मित्र म्हणून सल्ला देतो. ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. मुंबईतील कास्टिंग एजन्सी पैसे घेऊन काम देऊ म्हणतात. एखादी कार्यशाळा केल्यास भूमिका देण्याचे आमिष दाखवतात. अशा लोकांपासून दूर रहा. स्वतः परिश्रम घेऊन काम मिळवा. एखाद्या कलाकारासोबत फोटो काढून फेसबुकवर टाकणे हे ध्येय नसावे,’ असे योगेश सुचवतो.